मुख्यमंत्र्यांकडून जिवती तालुक्यातील पालडोह जि.प. शाळेचे कौतुक #chandrapur #Jivati


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात पालडोह जिल्हा परिषदेची शाळा आहे.
जिल्हा परिषदेची ही शाळा सुट्टीविना वर्षातील 365 दिवस अविरतपणे सुरु असते. त्या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजेंद्र परतेकी यांच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाविषयीच्या नवनवीन संकल्पना, अथक परीश्रम व समर्पक भावनेने काम करीत असतात, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्यातील शिक्षकांशी संवाद या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.
यावेळी, जिल्हाधिकारी कार्यालयातून शिक्षण विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. चव्हाण तसेच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत