Top News

गणरायाला निरोप देतांना गणेश मंडळांसाठी विसर्जनस्थळी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करा:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- चंद्रपूरातील गणेश विसर्जनाची भव्यता मोठी असते. त्यामूळे त्या दिवशी प्रशासनाची जबाबदारी अधिक असणार आहे. त्यामुळे वेळेत विसर्जनस्थळी नियोजितरित्या काम करत गणरायाला निरोप देण्यासाठी येणार असलेल्या गणेश मंडळांसाठी विसर्जनस्थळी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.
सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई नदीवरील दाताळा घाटाची पाहणी करत येथील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेता अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, बंगाली समाज शहर संघटक विश्वजित शाहा, हरमन जोसेफ, आदिंची उपस्थिती होती.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर यंदाचा गणेश उत्सव भव्यरित्या सुरु आहे. हिच भव्यता विसर्जनाच्या दिवशीही असणार आहे. यंदा सार्वजनिक मंडळांना रामाळा तलावा ऐवजी इरई नदी येथे विसर्जन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली आहे. सदर ठिकाणी विसर्जनाकरिता येणाऱ्या गणेश मंळडांना कोणत्याही अडचणी येणार नाही. असे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्या.
सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, अतिरिक्त लाईट, स्ट्रिट लाईटची व्यवस्था करण्यात यावी, सुरक्षेच्या दृष्टिने येथे आपत्ती व्यवस्थापनेच्या तुकड्या तैणात करण्यात याव्यात, गणेश मंडळांना मुर्ती विसर्जना करिता अधिक वेळ लागणार यासाठी सहा ठिकाणी असलेल्या विसर्जन गेटवर उत्तम व्यवस्था करण्यात यावी, वाहतुकीची नियोजित व्यवस्था करण्यात यावी गणेश भक्तांच्या सोयी सुविधांकडे विषेश लक्ष देण्यात यावे असे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने