Top News

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार:- ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur

आरवट येथील विकासकामांसाठी आमदार निधीतुन २५ लक्ष रु निधीची घोषणा

आरवट येथे आरो मशीनचे उदघाटन व सत्कार समारंभ संपन्न
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍यातील सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याच्‍याच एक भाग म्‍हणजे, २१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहीजे तसेच ‘जल है तो कल है’ असे प्रतिपादन वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत नागरिकांना आनंद, सुख, समाधान, यश, भरभराटी लाभो तसेच जो जे वांच्छिल तो ते लाहो अशा शुभेच्‍छा श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.



चंद्रपुर तालुक्यातील आरवट या गावी वित्त आयोगाच्‍या निधी तुन मंजूर शुध्‍द पाणी देणा-या आरो मशीनचे उदघाटन श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.आरवट या गावी २५ लक्ष रूपयांच्‍या निधीतुन विविध विकासकामांची घोषणा श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावेळी मंचावर प्रामुख्‍याने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, सरचिटणीस नामदेव डाहूले, ब्रिजभूषण पाझारे, राहूल पावडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, विकास जुमनाके, सरपंच सौ. सुलभा भोंगळे, उपसरपंच अलका कवठे, माजी सरपंच वंदना पिंपळशेंडे, रणजित डवरे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सचिव कु. रंजना मुळे, बबन क्षिरसागर, आरवट ग्रा.पं. सदस्‍य तसेच विविध गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्‍य आदिंची य उपस्थिती होती.
शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन महापुरूषांच्‍या विचारांचा आपण अंगीकार केला पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्‍हटले आहे. महात्‍मा फुलेंनी विद्ये विना मती गेली तर महात्‍मा गांधी यांनी पुस्‍तक जगातला सर्वात चांगला मित्र आहे असे म्‍हटले आहे. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या महापुरूषांचे दाखले देत आरवट या गावात शिक्षणाची उत्‍तम सुविधा निर्माण होण्‍याकरिता जिल्‍हा परिषद शाळेच्‍या माध्‍यमातुन कार्य करण्‍यात येईल, असेही श्री मुनगंटीवार म्हणाले.गावातील विकासकामांमध्‍ये लहान मुलांसाठी खेळणी , बंदिस्‍त नाली तसेच इतर कामांना पहिल्‍या टप्‍प्‍यात माझ्या स्‍थानिक विकास निधीतुन २५ लक्ष रूपये मंजूर करून तात्‍काळ कामे सुरू करण्‍यात येतील. तसेच शेती, शिक्षण, जलसंधारण, आरोग्‍य, रोजगार या क्षेत्रामध्‍ये प्रामुख्‍याने कामे करण्‍यात येईल. आरवट येथील भजन मंडळाला नविन साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. राज्‍यामध्‍ये भाजपा-शिवसेनेचे सरकार येताच ओबीसींचे राजकीय आरक्षण, नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रूपये देण्‍यात येतील यासारखे महत्‍वाचे निर्णय घेण्‍यात आले, असे श्री. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.
यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिपदी नियुक्ती झाल्या बद्दल भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने