Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आमच्या सभापतींना "खुर्ची द्या हो खुर्ची" #chandrapur #Korpana#Gadchandur


विरोधी पक्ष भाजपा नगरसेवक डोहे यांची मागणी
कोरपना:- गडचांदूर नगर परिषद ची स्थापना सन 2014 झाली व दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक सन 2020 ला पार पडली. आणि मोठ्या अपेक्षां ठेवून सौ. सविता टेकाम नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी कांग्रेसचे शरद जोगी उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले.
गडचांदूर शहर हे 40 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले औधोगिक शहर व या शहराचा सर्वांगी विकास करतील, प्रशासना वर वचक ठेवतील असे वाटत होते. परंतु यात पूर्णपणे कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. "आपण भले आपली खुर्ची भली" म्हणणाऱ्या नगराध्यक्षाला आपल्याच पक्ष्याच्या सभापतींच्या खुर्चीचा विसर पडला आहे. नगराध्यक्ष तथा तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या शून्य नियोजना मुळे नगर परिषद आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. सफाईकामगार यांचे 14 महिन्याचे वेतन देऊ शकत नाही, हे तर जगजाहीरच आहे. परंतु सत्तेत असलेल्या आपल्याच सभापतींच्या खुर्ची व टेबल हटविले ही किती "शोकांतिका" म्हणावे.
जरी सन्माननिय सभापती महोदयांना याची जरी गरज नसेल तरी आमच्या सारख्या विरोधी नगरसेवकांना तसेच जनतेला आपले गाऱ्हाणे मांडण्या करीता, समस्या सोडविण्याकरीता अत्यंत आवश्यक आहे. व जर त्यांना बसण्याकरीता व्यवस्था झाल्यास ते सन्मानपूर्वक नगर परिषद कार्यालयात वेळ देऊन जनतेच्या समस्या सोडविल या हेतूने विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली असून आतातरी सभापतींना स्वतंत्र खुर्ची देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत