Top News

ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली! #Chandrapur #Maharashtra #Mumbai #gadchiroli


आता 'या' तारखेला होणार मतदान
मुंबई:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. मतदानाच्या तारखेसोबतच आता मतमोजणीच्या तारखेतही बदल झाला आहे.
राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण आणि वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाने म्हटले आहे.
कोणत्या ठिकाणी निवडणूक, पाहा जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या

चंद्रपूर जिल्हा

भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1

गडचिरोली जिल्हा

चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.

पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70.

रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.

रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.

सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2.

नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.

नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.

पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.

सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.

अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1.

नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.

वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7

भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.

गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. 

एकूण 1,165 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक पार पडणार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने