चेक ठाणेवासना येथील '60 लाखांच्या' विकास कामांचे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते भूमिपुजन #Chandrapur #pombhurna


इंजि. वैभव पिंपळशेंडे यांनी मानले ना. सुधीर भाऊंचे विशेष आभार
पोंभूर्णा: तालुक्यातील चेकठाणेवासना येथे मनरेगा विशेष निधी, आमदार निधी आणि जनसुविधा निधी अश्या सुमारे 60 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. मारोती पा. वाढई, श्री. मारोती पा. धोटे आणि श्री. भास्कर पा. येलमुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये 30 लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रिट रोड, 15 लक्ष रुपये स्मशानभूमी आणि 15 लक्ष रुपये सोलर हाईमास्ट लाईट या कामांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गावातील मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता लाखोंचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा.ना.श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय (म.रा.) यांचे संपूर्ण गावकऱ्यांनी आभार मानले.
याआधी चेकठाणेवासना येथे व्यायामशाळा इमारत व साहित्य, सामाजिक सभागृह, क्रीडा साहित्य, ओपन जिम इत्यादी असे अनेक विकासात्मक गोष्टी सुधीर भाऊंच्या प्रयत्नांनी उपलब्ध झालेले आहे. यावेळी विनोद भाऊ देशमुख माजी उप-सभापती पं.स. पोंभूर्णा, सरपंच सुरेखा मेश्राम, उपसरपंच डॉ. नितेश पावडे, सदस्य इंजि. वैभव पिंपळशेंडे, सुलोचना देवाडे, सुचिता धोटे, संदीप कोडापे, माजी सरपंच प्रभाकर पिंपळशेंडे, भगीरथ पावडे, परशुराम वाढई तसेच गावातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत