राजुरा विधानसभा क्षेत्रातील अवैध धंद्याला आळा घाला #chandrapur #Rajura


माजी उपसरपंच कुमार स्वामी सालगमवार यांचे ना. मुनगंटीवार यांना निवेदन
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुगार चालविण्यासाठी स्थानिक पातळीवर काही व्यावसायिक तथा दारू विक्री व्यवसाय मध्ये घुसलेले व्यक्ती अधिकारी वर्गाता हाताला धरून ग्रामीण भागात ठराव घेण्यास हालचाली करत असल्याने निदर्शनास आले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील तेलंगाना बार्डवर असलेल्या विरुर क्षेत्रातील अन्नर अतरगाव येथे अशाच पध्दतीने ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यास गावकऱ्यांनी विरोध दर्शविला परंतु तालुक्यातील नेतेमंडळी तथा काही व्यवसायिक हितसंबंध जोपासत जुगार चालविण्यासाठी प्रयत्नशील प्रक्रिया करित आहे.
याच पध्दतीने गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या ठिकाणी हिच पध्दत नेतेमंडळी आणि व्यावसायिक करित आहे. यापूर्वी बसर येथे हिच प्रक्रिया अवलंबली नागरिक विरोध करीत सद्यस्थितीत बंद करण्यास भाग पाडले.
हिच प्रक्रिया कोरपणा तालुक्यातील कळमणा तळोबा या भागात सुरू आहे. हे सर्व बघता वाढत्या गुन्हेगारी ला आळा घालणे आवश्यक आहे. नागरिक सतत बाबतीत विरोध करित असतात पण काही हितसंबंध जोपासत नेतेमंडळी या व्यावसायिक अधिकारी ह्याच हाताशी धरून कार्य करित आहे. त्यामुळे नागरिकाचा विश्वास कमी होत आहेत.
राजुरा निर्वाचण क्षेत्रातील वाढत्या जुगार संदर्भात तथा नव्याने स्थापित होत असलेले अवैध धंद्यला आळा घालण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी माजी उपसरपंच कुमार स्वामी सालगमवार तसेच गावकऱ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत