पाचव्या दिवशी पर्यंत ४०६५ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन #chandrapur #ganpatibappa


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात श्रीगणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीपर्यंत एकुण ४०६५ मूर्तींचे विसर्जन झाले आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात ५६ मूर्तींचे विसर्जन पार पडले.
झोन क्र. १(अ ) अंतर्गत ८२१, झोन क्र. १(ब ) अंतर्गत २९७, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत - १४६३, झोन क्रमांक २ (ब ) - ३०२, झोन क्र. ३(अ) - ६६७, झोन क्रमांक ३ (ब ) येथे - ४५९ असे ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात झोन १ मध्ये २१, झोन २ मध्ये १६, झोन ३ मध्ये १९ असे एकुण ५६ मूर्तीं असे एकुण ४०६५ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापर्यंत झाले आहे. यात पीओपी मुर्ती एकही आढळुन आली नाही.
कृत्रीम कुंडात विसर्जन करून पर्यावरणास हातभार लावल्याबद्दल गणेशभक्तांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. याकरीता २३ कृत्रिम तलाव, २० निर्माल्य कलश व ३ फिरते फिरते विसर्जन कुंडांची उभारणी करण्यात आली आहे.
कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये झोन क्र. १ (कार्यालय) - २, साईबाबा मंदीर - १, दाताळा रोड,इरई नदी - २, तुकुम प्रा.शाळा (मनपा,चंद्रपूर) - २, नटराज टॉकीज (ताडोबा रोड) - २, गांधी चौक - १,शिवाजी चौक - २, रामाळा तलाव - ४,लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड - १, विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड - १, महाकाली प्रा. शाळा - १, सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ - २ , झोन क्र. ३ (कार्यालय) - २ असे एकुण २३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.
#SwachhCelebrations #CleenGreenFestivals
#CMC #Chandrapur #SwachhSurvekshan2023
#SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR #SwachhMaharashtraMissionUrban #ganeshchaturthi #ganeshidol
#SwachhBharatMission

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत