शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी बंडू हजारे तर जिल्हाप्रमुख पदी नितीन मते यांची नियुक्ती #chandrapur

Bhairav Diwase
0
नागपूर:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित केले असून, विदर्भात जिल्हाप्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत पक्ष संघटनेचा विस्तार केला जात आहे. नवरात्रीनंतर मुख्यमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून, नागपूर व अमरावती येथे जाहीर मेळावा घेणार आहेत.
रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, शिंदे गटाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी खा. तुमाने म्हणाले, पूर्व विदर्भात पूर्ण ताकदीने संघटना उभी केली जात आहे. दोनही आमदारांना विश्वासात घेऊन सर्व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आलेल्या विदर्भातील आमदारांनाही मंत्रिपदात न्याय मिळेल, असा दावाही तुमाने यांनी केला.
निवडणूक आयुक्त न्याय देतील

- दोन तृतीयांश आमदार व खासदार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आले आहेत. खरी शिवसेना ही आमचीच आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तदेखील याच गटाला न्याय देतील, असा विश्वासही तुमाने यांनी व्यक्त केला.
सर्व निवडणुकांत भाजपशी युती

- स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी सर्व निवडणुकांसाठी भाजपशी युती झालेली आहे. कुणी कुठे किती जागा लढवायच्या याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांची निवडणूक समिती घेईल. नागपूर महापालिकेत आमची युती किमान १२० जागा जिंकेल, असा दावा खा. तुमाने यांनी केला.
अशा आहेत नियुक्त्या

- नागपूर जिल्हा

नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख : मंगेश काशीकर

महानगरप्रमुख (पश्चिम, मध्य, उत्तर : सूरज गोजे)

जिल्हाप्रमुख : संदीप इटकेलवार

- चंद्रपूर जिल्हा

सहसंपर्कप्रमुख : बंडू हजारे

जिल्हाप्रमुख : नितीन मते

- गडचिरोली जिल्हा

संपर्कप्रमुख : संदीप बरडे

सहसंपर्कप्रमुख : हेमंत जंभेवार

महिला संघटिका : पौर्णिमा इस्टाम

जिल्हा संघटक : राजगोपाल सुलावार

- भंडारा जिल्हा

जिल्हाप्रमुख : अनिल गायधने

- गोंदिया जिल्हा

जिल्हाप्रमुख : मुकेश शिवहरे व सुरेंद्र नायडू

- वर्धा जिल्हा

जिल्हाप्रमुख : गणेश ईखार

जिल्हा संघटक : संदीप इंगळे

सहसंपर्कप्रमुख : राजेश सराफ

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)