विहीरीत उडी घेत इसमाची आत्महत्या #chandrapur #Saoli #suicide

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली तालुक्यातील गेवरा (बुज) येथील इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. नरेश रामचंद्र वाढणकर (58) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक नरेश रामचंद्र वाढणकर हे दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबातली व्यक्तींनी शोधाशोध केली असता कुठेही आढळून आले नाही. आज शनिवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता वाजताच्या सुमारास घरा जवळील विहिरीवर काही महिला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत प्रेत तरंगतांना दिसले.
यासंदर्भात माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाकरीता पाठविले
मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पाथरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार करीत आहे.