राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केली पाथ-वे ची स्वच्छता #chandrapur


चंद्रपुर:- स्वच्छता लीग निमित्त आयोजित स्वच्छता पदयात्रा कार्यक्रम संपन्न झाला, यात पठानपुरा गेट व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठानपुरा गेट भेट दिली होती. सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पठानपुरा ते विठोबा खिड़की मार्गातिल झुडपे, पाथवे स्वच्छ करण्यास श्रमदान केले.

दि. १९ सप्टेंबरला सकाळच्या वेळेस अभियान सुरु करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठानपुरा गेट भेट दिली.  या स्वच्छता मोहिंम करिता स्व:ता जिल्हाधिकारी पुढाकार घेतल्याने सकाळी -प्रो टीम, महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी, महसूल विभाग अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबत सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पठानपुरा ते विठोबा खिड़की मार्गातिल झुडपे, पाथवे स्वच्छ करण्यास श्रमदान केले.

यावेळी इको-प्रो चे बंडू धोतरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप गोंड सरदार पटेल महाविद्याल चंद्रपूर, महानगरपालिका, पालिका आरोग्य विभाग, इको-प्रो आपातकालीन विभाग, पुरातत्व विभाग सदस्य, उद्यान विभाग आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत