राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन #chandrapur


यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सातवे वर्ष
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- NGO बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय, औरंगाबाद या शासन मान्य संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यातील सेवेत कार्यरत शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन केले जाते.शासन मान्य संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षकांना आपल्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी कोवीड महामारीत देखील तन-मन-धनाने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्साहाने अन्नदान वाटप शैक्षणिक साहित्याचे वाटप योग्य गरजू व्यक्तींना मदत असे विविध काम केलेले आहे.तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुरुमाऊलींचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मान व्हावा, ही संस्थेची भूमिका आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत.या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक पंचधातूची ट्रॉफी, NGO शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र, पुस्तक,शाल,पुष्प देऊन सपत्नीक ( परिवारासमवेत) पुरस्कारर्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे.
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक २२ ऑगस्ट पासून ते १ नोव्हेंबर २०२२ पर्यत,"संपादक जीवन गौरव कार्यालय," प्लॉट नंबर २७, गल्ली नंबर ६, आनंदनगर गारखेडा परिसर औरंगाबाद, पिनकोड नंबर.४३१००९ मोबाईल नंबर. ८८८८१२५६१० या पत्यावर एक प्रतीत व रंगीत छायाचिञासह स्पीड पोस्ट डाक पोस्टानेच पाठवावयाचे आहेत. स्पीड पोस्ट डाक विभागाची पावती फोटो व्हाट्सअप वरती पाठवावा. दिलेल्या मुदतीच्या आत आपले प्रस्ताव येणे आवश्यक आहे. उशिराने प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.या प्रस्तावावित नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.
१) पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही पाच वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) सेवेत कार्यरत शिक्षक बंधू भगिनी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी kg... to...pg पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात बायोडाटा नसल्यास प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी सुंदर प्रस्तावाची एकच प्रत व सोबत रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) संस्थेचा एकच नियम "जो हाजीर तो वजीर" गैरहजर पुरस्कारार्थी दुबारा पुरस्कारासाठी अपात्र असतील.
८) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने गोपनीय समिती काम पाहते. समितीचे सर्व निर्णय हे अंतिम राहतील.
९) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०२२ असा स्पष्ट उल्लेख असावा.
१०) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
११) जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचे आजीवन सभासदांना दहा गुण, द्विवार्षिक सभासदांना ३ गुण, तर वार्षिक सभासदांना १ गुण संस्थेच्या वतीने दिले जातील.
१२) पुरस्काराचे स्वरुप आकर्षक पंचधातूची ट्रॉफी, NGO शासन मान्य संस्थेचे सुंदर प्रमाणपत्र, पुस्तक ,शाल , पुष्प असे स्वरुप असेल.असे आवाहन मुख्य संपादक रामदास वाघमारे, औरंगाबाद,उपसंपादक देविदास बुधवंत,अहमदनगर सहाय्यक संपादक
शामराव रावले,हिंगोली कार्यकारी संपादक नागनाथ घाटूळे,सोलापूर उपकार्यकारी संपादक विजयकुमार काळे,सातारा,गणेश कुंभारे सहसंपादक भंडारा,मारोती आरेवार,सीता टेकुलवार,सहसंपादक गडचिरोली व दुशांत निमकर,सहसंपादक चंद्रपूर यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या