नगराध्यक्षांचे गणेशोत्सव शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी चोरले #chandrapur #bramhapuri


ब्रम्हपुरी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे शहरात आगमन झाले व अबालवृधांनी धूमधडक्यात त्यांचे स्वागत केले. शहर शिक्षण व दवाखान्या साठी जेवढा प्रसिद्ध तेवढाच नावलौकिक गणेश उत्सवाचा सुद्धा, दरवर्षी प्रमाणे विघ्नहत्र्या चे आगमन मोठ्या उत्साहात झाले व नागरिकांत मोठा उत्साह दिसून आला मात्र काही अतीउत्साही समाज विघातकलोकं राजकारणाने ओतप्रोत होतं शहराचे वातावरण खराब करण्यात आपली धन्यता मानतात याचीचं प्रचिती शहराला आली असून ब्रम्हपुरीचे नगराध्यक्षा यांनी शहरात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रसंगी लावलेले बॅनर सुद्धा अज्ञात इसमांनी चोरून नेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगराध्यक्षा रिता दीपक उराडे आणि श्री. दिपक उराडे यांनी शहरातील विविध ठिकाणी गणेश उत्सवा निमित्त गणेश भक्तांना व समस्त नागरिकांना शुभेच्छा देणारे मोठं मोठे बॅनर दोन- दिवसापूर्वी शहरातील प्रदर्शनीय भागात लावलेतं मात्र त्यातील कुर्झा चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक व ख्रिस्तानंद चौकातील बॅनर रात्रौ सुमारास अज्ञात इसमांनी आकस बुद्धीने चोरून नेले.
इतर कुणाच्या कुठल्याचं बॅनरला हात लावले नसतांना हेतूपुरस्पर फक्त नगराध्यक्षा यांचेच बॅनर लंपास झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर मागील काही दिवसा पासून सुरु असलेल्या गणेश उत्साहातील आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाने सदर बॅनर फक्त गणेश उत्सव जत्रा परिसरातूनच गायब झाल्याने विशिष्ट लोकांवरच शहरातील नागरिकांचे अंगुलीनिर्देश होतांना दिसून येत आहे.
नगराध्यक्षा रीता उराडे गणेशोत्सव शुभेच्छा देणारे मोठे होल्डीग बॅनर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आले होते त्यामध्ये ख्रीस्तानंद चौक,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, व कूर्झा टि पाईंट चौक. इत्यादी ठिकाणी दोन तीन दिवसापासून बॅनर होते. व ते नागरिकांनी पाहीले परंतु तीनही चौकातील बॅनर खोडसाळ बुद्धीने व सुडाच्या भावनेने माझे बॅनर विरोधकांकडून काढण्यात आले असल्याचा आरोप नगराध्यक्षा रिताताई उराडे यांनी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत