Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न #blooddonation


डॉक्टर दाम्पत्यांनी मिळून केले रक्तदान; 31रक्तदात्यानी केले रक्तदान
कोरपना:- अष्टविनायक गणेश मंडळ गडचांदूर च्या वतीने स्थानिक गांधी चौकात मंडपात शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर ला भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, या प्रसंगी शिबिराचे उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुशीलकुमार नायक हे लाभले होते, तर प्रमुख उपस्थिती मध्ये सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी, नगरपरिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी, डॉ, प्रवीण लोनगाडगे, डॉ, विकास डोके, डॉ, स्नेहल डोके, अशोक एकरे, बालाजी पुरी हे लाभले होते.

या वेळी आयुष रक्त पेढी नागपूर चे श्री, राहुल, निकिता व त्यांच्या चमु ने रक्तदात्यांचे रक्तगट तपासून रक्त संकलन केले. परिसरातील 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अष्टविनायक गणेश मंडळ दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम राबवून जनहिताचे व समाजहिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून मंडळातर्फे राबविले जातात त्याचाच एक भग म्हणून या वर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदात्यांची नावे, डॉ, प्रवीण लोनगाडगे, डॉ विकास डोके, डॉ स्नेहल डोके, सोनाली, सतिश बिडकर, तिरुपती चायकाटे, राकेश शेंद्रे, तुषार खोके, मेघराज एकरे,कुलदीप गणोरकर, सुकेश ठाकरे, सोनू मेश्राम, वैभव किनेकर, वैभव गोरे, गणेश आमने, संजय ढेपे, सौ सोनाली प्रशांत वागदरकर, पुरुषोत्तम ठाकरे, हरी कुसळे, संजय ढेपे, बबन भोयर, नितीन सोनटक्के, विनोद मोटघरे, गुरू मेश्राम, अशोक मिसलवार, मारोती आदे, राकेश राठोड, इत्यादींनी रक्तदान केले.
सर्व रक्तदात्याना आयोजकांच्या वतीने गडचांदूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्नेहभेट म्हणून टी शर्ट देण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी अष्टविनायक गणेश मंडळाचे सतीश बिडकर, उद्धव पुरी, संजय ढेपे, सदाशिव गिरी, निखिल एकरे, दिनेश डांगी, वैभव गोरे, मेघराज एकरे, कार्तिक तुरणकार, राकेश गोरे, बादल पेचे, सचिन रागीट, बंडू चौधरी, तेजस बरसागडे, व सन पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन उद्भव परी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत