चंद्रपूर:- सध्या सर्वांना ऑनलाईन खरेदीची सवय झालेली आहे. त्यामुळे काही सायबर क्रिमीनल या संधीचा उपयोग करुन अनेक फेंक वेबसाईट तयार करुन ग्राहकांची लुट करीत आहेत.
वेगवेगळ्या ऑफरची आमीष दाखवुन ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढुन त्यांची लुबाडणूक होत असल्याने आताच सावध होणे आहे. कोणतेही आर्थीक व्यवहार करतांना सदर वेबसाइट HTTPS:// यापासुन सुरु होत आहे का? हे तपासुन बघावे व कोणत्याही कॉलसेंटर मँधील व्यक्तींच्या जाळ्यात न फसता थोडा वेळ घ्यावा व खात्री झाल्यानंतरच आर्थीक व्यवहार करावा. असे आवाहन अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी केले आहे.