Top News

फेसबुक, मॅट्रोमनीद्वारे अनेकांना लुटले chandrapur


अखेर चंद्रपुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंद्रपूर:- बनावट आयडी तयार करून फेसबुक व मॅट्रोमनीद्वारे महिलांशी संपर्क साधून मैत्री करायची. त्यानंतर महिलाशी संपर्क साधुन फसवणूक करायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन कोठारी अंतर्गत् एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकद्वारे बनावटी आयडी तयार करून तिच्या सोबत मैत्री करून विश्वास संपादन केला. तिच्या घरी मुक्काम ठोकून सकाळच्या सुमारास महिला मॉर्निंगवाकला गेल्या नंतर तिच्या घरातून २४ तोळे सोन्याचे दागीने लंपास करून एक इसम फरार झाल्याची तक्रार नोंदविण्यता आली होती. ह्या गुन्ह्याचे गांभिर्य पाहून पोलीस अधीक्षक अरवींद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले होते.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे यांच्या नेतृत्वात पथक तयार करून तपास करण्याचे आदेश दिले होते. तांत्रीक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपास संशयीत आरोपीची प्राथमिक माहिती मिळाली होती. आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कावळे यांच्या नेतृत्वात एक पथक भंडारा येथे रवाना करण्यात आले होते. या पथकाने आरोपी सोहम वासनीक याला भंडारा येथून ताब्यात घेतले.
यानंतर आरोपी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी सोहम वासनिक याने, सुमित बोरकर नावाने फेसबूक व जिवनसाथी मॅट्रोमनी नावाने बनावट खाते तयार केले होते. सोशल मीडियाच्या बनावट आयडीद्वारे तो महिलांशी संपर्क साधून मैत्री करायचा. आरोपीची पत्नी ही मृत्यू पावली असून त्याला एक मुलगी असल्याचे तो सांगत होता. तसेच लहान मुलीचा फोटो मात्र तो दुसऱ्याच मुलीचा सोशल मीडियावर ठेवत होता. तसे या माध्यमांद्वारे तो एम.बी.बी.एस, एम.डी. स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याचे महिलांना सांगत होता. त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला या नावाने आयडी कार्ड तयार केला होता. तसेच कार्डवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावलेला होता. सुमित बोरकर, वैद्यकीय अधिकारी, अकोला या नावाची १ लाख ४४ हजार रूपयाची पे स्लीप बनवून मैत्री झालेल्या महिलांना पाठवायचा. त्यांनतर लग्न करायचे सांगून वारंवार होत असलेल्या संपर्काद्वारे विश्वास संपादन करायचा. मैत्रीनंतर त्यांचे घरी जावून काही अडचणी सांगून पैसे व दागिन्यांची मागणी करीत होता. तो एवढ्यावरच थांबत नव्हता तर महिलांनी दागिने अथवा पैसे दिले नाही तर चोरी करून दागिने व रक्कम लंपास करीत असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने