पांदण रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्या. #Chandrapur

Bhairav Diwase

ना. सुधीर मुनगंटीवार यांना रवि गायकवाड यांची निवेदनाद्वारे मागणी

राजुरा:- चुनाळा ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड यानी चुनाळा येथील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता जनहितार्थ पांदण रस्ते त्वरित होण्याकरिता निधी मागणी मंत्री महोदय याना केली. मान्सून पुर्व हित लक्षात घेता शेतात जाणे येणे करण्यास पांदण रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचे कळविले.
शेतकऱ्यांना शेतात जाताना पाऊस असताना त्रास होत असल्याचे लक्षात घेता ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे गेट ते अशोक वांढरे ते वामण रागिट यांच्या शेतकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी केली या उपरोक्त ईतर पांदण रस्त्याच्या कामाविषयी उल्लेखनीय बाब सांगितले. मान्सून पुर्व शेतकऱ्यांना शेतात खते , नागर , बैलगाडी व अन्य साहित्य पुर्विच नेऊन ठेवावे लागत असल्याचे सांगितले.
चौहिबाजुनी रस्त्याच्या दुतर्फा कडेला चिखल जमा होत असल्याने बैलबैडी वा शेतकऱ्यांना जाणे शेतात शक्य होत नाहीत. अशापरिस्थित रास्त मागणी लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांनी मा.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार वने तथा सांस्कृतिक कार्य मंत्री याना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात ग्रामीण भागातील रस्ता ची अवस्था अत्यंत दैनंदिन असुन ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्ता, नाली व पांदण रस्ता ईतर कामासाठी निधी ची आवश्यक आहे.
सदर रस्ता हा शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असून रहदारी रस्ता आहे. या रस्त्याने नेहमी शेतकरी जाणे येणे करित असुन सद्यस्थितीत रस्ता पुर्णता खराब आहे. वारंवार शेतात जाणे येणे मान्सून पुर्व काळात शक्य नसल्याने शेतात ठेवलेले सामान चोरीला जात असल्याचे सुध्दा सांगितले.त्यामुळे शेतातील पांदण रस्ता होणे न्यायोचित आहे.
तरीही खालील प्रस्तावित कामाना मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावात अशी मागणी केली.

१) राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत चुनाळा अत्तर्गत रेल्वे गेट ते अशोक वांढरे -अशोक वांढरे ते वामण रागीट कडे जाणाऱ्या शिव धुरा पांदण रस्त्याच्या कामास (कि.मी.२.५०)

२)जैतोबा पांदण -जगदीश वाढरे ते श्यामराव वाढरे यांच्या शेतकडे जाणाऱ्यापांदण रस्त्याच्या कामास

३)कवटी पांदण - या पांदण रस्त्याच्या कामाला या पुर्वी निधी उपलब्ध करून दिला पंरतु त्यानंतर उर्वरित पांदण रस्ता होणे आवश्यक असल्याने यास निधी ची आवश्यक आहे.

४) चुनाळा ग्रामपंचायत हद्दीतील अत्तर्गत लक्ष्मण निमकर ते सुरेश पंदिलवार (अदाजे ५०० मिटर )यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कामाचे अन्य कामाचे निवेदन मंत्री महोदय याना रवी गायकवाड यांनी दिले.

सदर सदस्यांनी केलेली मागणी रास्त जनहितार्थ असल्याने उपरोक्त कामास निधी उपलब्ध करून देऊ रवि गायकवाड याना सांगितले.


👇👇👇👇