Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या दिल्ली कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट #chandrapur


चंद्रपूर:- मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था असून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्केल प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जिवनात जीवन कौशल्य विकासाचे काम अविरतपणे सुरू आहे. याच कामाची पाहणी करण्याकरिता जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा या गावामध्ये मॅजिक बस हेड ऑफिक दिल्ली येथून अधिकारी गीतांजली मॅम, झोया मॅम आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांनी भेट दिली.
  पाहुण्यांचे आगमन झाल्या नंतर बोर्डा केंद्राचे केंद्र प्रमुख मा. प्रकाश कूमरे , मुख्याध्यापक सुनील गेडाम , शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, ग्राम कमिटी, बाल मंत्रिमंडळ, इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या मराठी पारंपरिक पद्धतीने  पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनी मॅजिक बस चे ट्रेन टीचर मा. प्रशांत काटकर यांचे सत्र बघून त्यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, शिक्षकवृंद ,अध्यक्ष, सरपंच, सदस्य  यांच्याशी मॅजिक बसच्या उपक्रमाबाबत चर्चा करून मते जाणून घेतली. आणि चालत असलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले. बालमंत्रीमंडानी पाहुण्यांना तयार केलेले लर्निग सेंटर दाखविण्यात आले. या लर्निग सेंटर चा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो. या बद्दल सविस्तर पणे माहिती दिली.
 बालमंत्रीमंडानी पाहुण्यांना विद्यार्थ्यानी घरी तयार केलेले अभ्यास कोपरे दाखविण्यात आले. हा अभ्यास कोपरा का घरी असला पाहिजेल . आपल्याला कसा  अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे हे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेले ग्रीटिंग कार्ड शाळेकडून पाहुण्यांना भेट म्हणून दिले.  या कार्यक्रमात समस्थ ग्रामवासी, पालक, युवा, युवती संस्थानी सक्रिय सहभाग घेतला,
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी 
शाळा सहाय्यक अधिकारी नालंदा बोथले, पायल राजपूत , संदेश चुनारकर, सतीश खंडारे , गणेश दुदबले , गंगाधर जाधव समूदाय समन्वयक  सचिन  डोर्लिकर यांनी परिश्रम घेतले, तर हा सर्व कार्यक्रम शाळेतील बाल मंत्रिमंडळ यांच्या नियोजनात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत