सरदार पटेल महाविद्यालयाला नॅक समितीची भेट #chandrapur

चंद्रपूर:- उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची पडताळणी, तसेच गुणात्मकदृष्ट्या दर्जा देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्थ व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली संचालित नॅकची बंगलूरु येथे १९९४ पासून स्थापन करण्यात आली असून 14 ते 15 सप्टेंबरला नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने सरदार पटेल महाविद्यालयाला भेट दिली.

या समितीमध्ये नॅक पीआर टीमचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. देबाशिष भट्टाचार्यजी, नॅक पीआर टीम समन्वयक प्रोफेसर डॉ. पिरझादा, सदस्य प्रोफेसर डॉ. एडविन ज्ञानदास यांचा समावेश होता. त्यांनी महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षात करिक्युलर आस्पेक्ट, टीचिंग लर्निंग ॲड इव्हॅल्युएशन, रिसर्च, कंसलटन्सी ॲड एक्स्टेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर ॲड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट ॲड प्रोग्रेशन, गव्हर्नन्स, लिडरशीप ॲड मॅनेजमेंट, इनोव्हेशन ॲड बेस्ट प्रॅक्टिसेस, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, NCC विभाग, संगणक, ग्रंथालय, जनसंवाद व महाविद्यालयातील सर्व विभाग अशा विविध निकषांनुसार जे कार्य केले गेले. त्याचे गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून कागदपत्राची तपासणी केली. शिवाय महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य शाखेंतर्गत पदवी, पदव्युत्तर विभागांना आणि रिसर्च सेंटरला भेट दिली.
पालक तसे माजी विद्यार्थी व आजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली. मॅनेजमेंटशी संवाद साधून महाविद्यालयीन गुणात्मक बाबीची चर्चा केली.
महाविद्यालयाचे विविध स्तरांवर असेसमेंट करून एक्झिट मिटींगमध्ये नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांच्याकडे अहवाल सादर केला. उपप्राचार्य तथा समन्वयक डॉ.स्वप्निल माधमशेट्टीवार, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत