अखेर नगरपरिषदेचे उपाध्यक्षावर गुन्हा दाखल #chandrapur #Korpana #Gadchandur

आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये उल्लेख
कोरपना:- औद्योगिकरणामुळे गडचांदूर परिसरातील शेतजमिनीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. अशाच जमिनीच्या एका व्यवहारात येथील विलास मांडवकर यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी विषप्राशन केले उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.


दरम्यान, मांडवकर यांची एक कथित सुसाईड नोट मध्ये नाव असलेल्या नगर परिषद चे उपनगराध्यक्ष शरद जोगी व प्रशांत पाचभाई यांच्यावर भारतीय दंडसंहिता 1860 कलम 306 व कलम 34 नुसार गुन्हा दाखल झाला असून सध्या जोगी व पाचभाई फरार आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर असे की,यात विलास यांनी मनोज शर्मा नामक इसमासोबत ६० लाख रुपयात त्यांच्या आजीच्या नावाने असलेल्या शेतजमिनीचा सौदा केला. मात्र, शर्मा यांच्यासह दिनेश सोनी, मनोज शर्मा, बाळू घायवनकर, गजानन गानफाळे, पंकज गंपावार यांनी पाच एकराऐजवी वडिलांकडून ११.५ एकरीच रजिस्ट्री करुन घेतली. शरद जोगी आणि प्रशांत पाचभाईने पैशाचे आमिष दाखवून आमच्याकडून जमीन हिसकावली, असा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये होता.
वडगाव शेतशिवारात विलास यांच्या आजीच्या नावाने ११. ५ एकर शेती होती. त्यापैकी पाच एकर शेती विक्रीचा व्यवहार शरद जोगी यांच्यासोबत झाला होता. परंतु रजिस्ट्री ११. ५ एकरची केली. धनादेशद्वारे पैसे दिले. परंतु दबाब टाकून ते पैसे परत मागत होता. एक धनादेश परत घेतला. दुसरा धनादेश वटला. त्याचे पैसे परत दे नाही तर कुटुंबीयाला जीवानिशी मारतो, अशी धमकी देत होता. याच धमकीला घाबरुन विलास मांडवकर यांनी आत्महत्या केली, असा आरोप मृताच्या मुलाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्षांचा सुसाईड नोटमध्ये नाव आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला अटक करु, अशी ग्वाही ठाणेदार सत्यजित आमले यांनी मृताच्या नातेवाईकाना दिली. दुसरीकडे जोगी यांनी सुसाईड नोट बनावट असल्याचा आरोप करणाऱ्या जोगी विरुद्ध कलम 306 व कलम 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपवभागीय अधिकारी सुशील कुमार नायक, व पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गद्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत