Top News

पोंभुर्णा भाजपकडून जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा सत्कार #chandrapur


देवराव भोंगळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
चंद्रपूर:- १६ सप्टेंबर रोजी नागपूरात धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानिमित्ताने १७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्‍याच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजराजेश्वर मंदिराच्या सभागृहात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, तालुका महामंत्री ओमदेव पाल, ईश्वर नैताम, माजी पं. स. सभापती विनोद देशमुख,माजी सदस्य गंगाधर मडावी, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, तुळशीराम रोहणकर, बाळू पिंपळशेडे, गजाजन मडपूवार, नगरसेवक मनोज रणदिवे, भाजयुमोचे अध्यक्ष अजय मस्के, मोहन चलाख, नगरसेविका सौ. श्वेताताई वनकर, सौ. नंदाताई कोटरंगे, सौ. आकाशीताई गेडाम, राजेश सुरावार, शैलेंद्र बैस, रोश ठेंगणे, रंजीत पिंपळशेंडे, वैभव पिंपळशेडे, अमोल पाल, आदित्य तुंमलवार, सुगत गेडाम, भारत निमसरकार, अरूण कुत्तरमारे आदिंसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने