अज्ञात चोरट्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात केली चोरी #Gadchiroli
गडचिरोली:- शहरानजीकच्या सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या तिरूपती बालाजी मंदिरातील कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सर्व सामान पळवून नेले. ही घटना शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कित्येक वर्षांचा ठेवा चोरट्यांनी लंपास केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट आहे. देवाचे दागिने, घंटा, तांबळाचे व पितळेचे काही सामान चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
गडचिरोली शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने आता यावर कारवाई करावी तसेच मंदिरातच चोरी झाल्याने अज्ञात चोरट्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी भाविक भक्तांकडून व नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात अशा वारंवार घटना घडत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत