भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांचा भारतीय छात्र संसद, पुणे येथे सहभाग #Chandrapurचंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांचा विश्व शांती विद्यापीठ पुणे तर्फे आयोजीत १२व्या भारतीय छात्र संसद येथे सहभाग घेतला आहे.सदर छात्र संसद एमआयटी कॉलेज येथे १५,१६,१७ सप्टेंबर होत आहे.
यामध्ये देशातील सुशिक्षित युवकांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा भारतीय छात्र संसदेचा मुख्य उद्देश आहे,तसेच देशात सुरू असलेल्या प्रमुख समस्यांबाबत विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाते,या भारतीय छात्र संसद मधे देशभरातील युवक व युवती सहभागी होतात,तसेच यामधे देशातील विविध मुद्यांवर चर्चासत्र सुद्धा आयोजित केले जाते.तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर यामधे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत