Click Here...👇👇👇

पैशाच्या वादातून पित्याने मुलावर गोळी झाडून केली हत्या #firing

Bhairav Diwase
1 minute read

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील धुळेपल्ली येथे मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादात वडिलाने अंगणात झोपलेल्या मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली.
रानू आत्राम (३२) असे मृत मुलाचे नाव आहे. कोपा वंजा आत्राम (६०) असे आरोपी पित्याचे नाव असून ताडगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तालुक्यात सध्या बांबू कापणीची कामे सुरू असून रानू आणि त्याचे वडील कोपा दोघेही तेथे मजुरी करायचे. घटनेच्या दिवशी पिता-पुत्रात मजुरीच्या पैशांवरून टोकाचा वाद झाला. यात रानू जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी ताडगाव पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दरम्यान, रात्री रानू अंगणात झोपलेला असताना आरोपी पित्याने घरातील भरमार बंदुकीतून त्याच्यावर गोळी झाडली