भद्रावती:- माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावर एका युवकाने पुलाच्या लोखंडी पाईपला कंबरेच्या बेल्ट नी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
तेजस्वी विजय मोगरे (२६) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव असून तो यवतमाळ येथे शिकत होता. तो वणी येथे गणपती पूजेसाठी त्याचे काका अजय मोगरे यांच्याकडे आला होता. लोकांनी त्याला लटकलेले पाहून माजरी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विनीत घागी हे आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविला.
तेजस्वी मोगरे या तरुणाचा कालच एम.ए.परीक्षेचा निकाल लागला. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. तरीही तो नाराज होता.वृत्त लिहेपर्यंत मृत्यूचे कारण समजू शकले नाही.