वाघाच्या हल्ल्यात गुराख्याने गमावला जीव #Tiger #tigerattack

गडचिरोली:- गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.९) दुपारी २ च्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गावरील कक्ष क्रमांक ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे (वय ६०, रा. कळमटोला) असे गुराख्याचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. कालच देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे एक जणाला वाघाने ठार केले होते. त्यानंतर आज गडचिरोली तालुक्यात वाघाने एकाचा बळी घेतला. सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत