सिंदेवाही महसूल प्रशासन झाले सक्रिय #sindewahi


बिना नंबर ची ट्राली कशी?
सिंदेवाही:- तालुक्यात गौण खनिज वस्तूच्या चोरीचा धुमाकूळ सुरू असल्याच्या बातम्या रोज वर्तमान पत्रात झळकत असताना अखेर महसूल विभाग मधील कर्मचारी अवैध रेती तस्कर वर करावाही करण्यास भाग पाळत आहे. कारण जनसामान्य नागरिकात रेती तस्कर व महसूल विभाग मधील यांच्या मैत्रीच्या चर्चा नागरिकात होत होत्या. शेवटी जनसमान्य नागरिकात महसूल विभाग मधील कर्मचारी यांची प्रतिमा ढासळत होती.
अखेर या रेती तस्करावर कारवाई केल्याशिवाय आत्ता पर्याय नसल्याने सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी रात्रीची गस्त करीत असताना रेती तस्करांच्या ट्रॅक्टर वर धडक कारवाही करीत रेतिसह ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावला.

सदर ट्रॅक्टर हा शहरातील नामांकित पदाधिकारी यांचा असल्याची चर्चा होत असली तरी जगदीश कन्स्ट्रक्शन चे श्री नागापुरे यांच्या मालकीची ट्रॅक्टर असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली आहे. सध्या रेती तस्करी करण्याचा धुमाकूळ सुरु आहे अश्यातच मंगळवारी रात्री बारा वाजता दरम्यान तहसीलदार गस्त करीत असताना जगदीश कन्स्ट्रक्शन ची रेती भरलेली ट्रॅक्टर रस्त्याने येत असल्याची दिसली. त्यामुळे सदर ट्रॅक्टर थांबवून तिला जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आले. सदर ट्राली ला नंबर च नसल्याने परत एकदा ट्राली बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या ट्रॅक्टर तहसील कार्यालय मध्ये जप्त असून रेती तस्करी बाबत चर्चेला उधाण आले आहे. 
सदर ट्रॅक्टर वर एक लाख सतरा हजार रुपयाचे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अजून पर्यंत  जप्त असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली आहे.
मात्र ट्रॅक्टर वरील जगदीश कंट्रक्शन हे नाव हे सिंदेवाहीं- लोनवाहीचे राजकीय व्यक्तीचे  कंट्रक्सनचे असल्याचे चर्चिले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत