सुचिता संतोष जिरकुंटवार जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेक खापरी पं. समिती पोभुर्णा येथे सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या सेवेला 21 वर्ष पुर्ण झालेली आहेत.त्याच्या या काळात त्यांनी अनेक सामाजिक, राष्ट्रीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय कार्य केले.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम व नवोपक्रम राबविले.आकाशवानी चंद्रपूर येथे बालसभा कार्यक्रमात सहभाग घेतला. नवरत्न स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम. क्रीडा स्पर्धा याच्यात विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.त्यांनी विद्यार्थ्यांचे हस्तलिखित प्रकाशित केले . गावातील दहावी , बारावी तसेच नवोदय व स्काॅलरशीप शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वहस्ते सत्कार केला. सुनेला मुलगी समजून पुनर्विवाह करून देणाऱ्या गावातील अशिक्षित आदिवासी जोडप्यांचा सत्कार केला. अशे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहे.
कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तसेच स्वतः शिवलेले मास्क वृद्धाश्रम, गरजू व्यक्ती अनाथाश्रम येथे वाटप केले. त्याच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेत . सुचिता संतोष जिरकुंटवार यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई गौरकार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ ,मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले. 
 
या कार्यक्रमाला मान.आमदार जोरगेवार साहेब. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाकर्डे ,शिक्षणाधिकारी दिपेद्र लोखंडे, कपिलनाथ कलोडे, अशोक माटकर पशुसंवर्धन अधिकारी डॉ हिरूटकर, कार्यकारी अभियंता प्रियंका रायपुरे , विश्वजीत शहा विलास बनकर इत्यादींची उपस्थित होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत