Top News

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.

भारत स्काऊट -गाईड कार्यालयाला कुंडी व वृक्ष भेट.
जिल्हा सहसचिव मंगेश सोनुले यांचा वाढदिवस साजरा

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर चे जिल्हा सह सचिव मंगेश सोनुले यांच्या वाढदिवसानिमित्य चंद्रपूर भारत स्काऊट -गाईड कार्यालयाला वृक्ष व कुंडी भेट देऊन वाढदिवस साजरा केला.  यावेळी चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक, स्काऊट, दीपा मडावी, जिल्हा संघटिका गाईड, किशोर उईके,  जिल्हा प्रशिक्षक तथा शिबीर प्रमुख,  प्रमोद बाभळीकर, शिबिर सहाय्यक,  प्रशांत खुसपुरे,  शिबिर सहाय्यक, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, शीतल मंगेश सोनुले, चंद्रपूर जिल्हा युवती उपाध्यक्षा, राखीता मंगेश नागोसे, मुल तालुका युवती सचिव, दिवाकर गावतुरे आदींची उपस्थिती होती.

 नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस व राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या नेतृत्वात हा वाढदिवस उपक्रम घेण्यात आला.
स्काऊट -गाईड च्या नियमावली मधे पाचवा नियम स्काऊट-गाईड प्राणीमात्रांचा मित्र असतो व निसर्गावार प्रेम करतो. तसेच नेफडो संस्थेचे सुद्धा पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संदर्भात कार्यरत आहेत. त्यामुळे मंगेश सोनुले यांनी चंद्रपूर भारत स्काऊट -गाईड कार्यालय येथे वृक्ष, कुंड्या भेट देऊन वाढदिवस साजरा करून निसर्गावर प्रेम करा असा संदेश दिलाय.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने