Top News

भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजुरा येथील सोमेश्वर मंदिरात पूजापाठ व होमहवन कार्यक्रम संपन्न.(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेन्द्रजी मोदी उज्जैन मंदिराच्या कॉरिडॉरची ओपनिंग करणार आहेत त्या अनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शिव मंदिर सोमेश्वर मंदिर राजुरा येथे सकाळी 11 वाजता समस्त भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा व होमहवण दत्ता महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. 


   यावेळी भाजपा जेष्ट नेते मा. अरुणभाऊ मस्की, तालुकाध्यक्ष सुनिलभाऊ उरकूडे, माजी नगरसेवक राजुभाऊ डोहे, जिल्हा सचिव हरीभाऊ झाडे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, सचिनभाऊ डोहे, तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सचिनभाऊ शेंडे, प्रदिप बोबडे, दिपक झाडे, सुरेश रागीट, सचिन बैस, दिलीप गिरसावळे, राजु वाटेकर, संदिप पारखी, अनिल खनके, मासिरकर, अशोक कलपल्लीवार, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने