Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत कीन्ही तर्फे सामूहिक फळबाग लागवडीला सुरुवात


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:-  दि. 10/10/२०२२ रोजी *" "कीन्हीं"* येथे *सामूहिक फळबाग लागवड* कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. कीन्ही येथील वनहक्क जमिनीच्या जागेवर ग्रामपंचायत कीन्ही व आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीन्ही येथे *"सामूहिक फळबाग लागवड"* उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन तर्फे विविध प्रकारच्या फळझाडांची रोपे व खते उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर ग्रामपंचायत कीन्ही यांच्या तर्फे सामूहिक वनहक्क जमिनीच्या 7 एकर जागेवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मध्यमातून त्या रोपांचे संगोपन व संवर्धन करून भविष्यातील भेळसावणाऱ्या रोजगाराच्या संबंधाने गावातील नागरिक पलायनाच्या समस्येवर आळा बसणार असून गाव स्वावलंबी व स्वयंरोजगारपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. आजच्या या स्तुत्य उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष पंचायत समिती कार्यालय चे अभियंता मा. सीडाम साहेब,ग्रामपंचायत कीन्ही चे मा.सरपंच भारत गेडाम, ग्रा.स. श्री.वामन पेंदाम, कृषिमित्र श्री. रेवन गुरनुले, श्री.जनार्दन गावंडे,श्री.वामन भेंडारे, श्री.निलेश बोडकुलवार,श्री.हीवराज लोणारे ,श्री.तोमेश गुरनुले ,श्री.आकाश गेडाम साहेब रोजगार सेवक ग्रा.प. कीन्ही, आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन चे विकास अधिकारी मा. सतीश सामृतवार, राकेश पाखमोडे व रो.ह.यो कामगार तसेच समस्त कीन्हीं ग्रामवासीय उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत