Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वर्षा भांडारकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

वर्षा भांडारकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- नवभारत विद्यालय येथील सहा. शिक्षीका वृक्षप्रेमी, मूल नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियान प्रचारक सौ. वर्षा भांडारकर यांची मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था यांचे वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
   शैक्षणीक कार्य प्रामाणिकपणे सांभाळून निसर्गाप्रती संवेदनशील राहून जनजागृती करण्याचे महतकार्य सौ. वर्षा भांडारकर गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. वृक्षप्रेमी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख आहे हे विशेष.
    या विशेष कार्याची दखल घेऊन मराठीचे शिलेदार या बहुउद्देशीय संस्थेने यंदा हा प्रतिष्ठेचा बहुमानाचा पुरस्कार सौ. भांडारकर यांना घोषीत केला आहे.
     मान्यवरांचे हस्ते लातूर येथे हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार असून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे, मुख्याध्यापक अशोक झाडे, सहयोगी शिक्षक तथा शहरातील मान्यवरांनी सौ. भांडारकर यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत