विज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा लाईनमन च्या जिवावर बेतला chandrapur pombhurna


करंट लागुन लाईनमन चा मृत्यू


पोंभूर्णा :- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणुन शेतातील एका खांबावर लाईन दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन चा करंट लागुन मृत्यू झाल्याची घटना पोंभूर्णा उप पोलिस स्टेशन हद्दितिल चेक हत्तीबोडी येथे दि.२२ आक्टोंबर ला दुपारी १२ वाजता उघडकीस आली.


दिपक बाळा पेंदाम वय ३२ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो मुळचा सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी आहे. तो पोंभूर्णा येथील विज वितरण कंपनीत विद्यूत सहाय्यक पदावर कार्यरत होता.
चेक हत्तीबोळी येथील लाईन दुरुस्ती करण्यासाठी डिपिवरील लाईन बंद असल्याची खात्री करून तो खंब्यावर चढला काही वेळ काम केल्यानंतर अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्याला करंट लागला यातच तो गतप्राण झाला. ऑपरेटच्या निष्काळजीपणामुळे लाईनमन दिपकचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
-काही काळ तणावाचे वातावरण-

मृतकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व तत्काळ नौकरी देण्यात यावे यासाठी नातेवाईक, राजकीय पदाधिकारी व गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला यावेळी तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी वेळीच परस्थिती हाताळल्याने तणाव शांत झाला.
यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी नातेवाईकांनी केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या नंतर मृतदेह उचलण्यात आले. ग्रामिण रुग्णालय पोंभूर्णा येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतकाचे पश्च्यात आई,पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगडे, पोंभूर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी, उमरीचे ठाणेदार किशोर शेरकी, कार्यकारी अभियंता तेलंग, माजी सभापती अलका आत्राम, माजी सभापती विजय कोरेवार सावली, नगरसेवक दर्शन गोरंटिवार, पॅंथरचे रूपेश निमसरकार, नगरपंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरिवार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत