Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दिपक पेंदाम यांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने आकस्मिक मृत्यू #chandrapur #pombhurna


ना. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन केलेली ५ लाख रूपयांची मागणी मान्‍य
पोंभुर्णा:- तालुक्‍यातील चेक हत्‍तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्‍ये कार्यरत असणारे वायरमन श्री. दीपक पेंदाम हे विद्युत दुरूस्‍तीचे काम करीत असतांना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्‍यामुळे विजेच्‍या धक्‍क्‍याने त्‍यांचा आकस्मिक मृत्‍यु झाला. त्‍यांच्‍या मागे त्‍यांची पत्‍नी व तीन व दिड वर्षीय दोन मुली आहेत व त्‍या दोन्‍ही मुली दिव्‍यांग आहेत.

करंट लागुन लाईनमन चा मृत्यू

क्षेत्राचे आमदार व वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या दुर्देवी घटनेबद्दल तिव्र शोक व्‍यक्‍त केला असून या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश महावितरण कंपनीच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांना दिले आहेत. त्‍याच बरोबर त्‍यांच्‍या पश्‍चात त्‍यांच्‍या कुटूंबियांची परिस्‍थीती अतिशय हलाखीची झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन ५ लाख रूपयांची मदत मिळावी अशी लेखी विनंती मा. मुख्‍यमंत्र्यांना केली आहे. त्‍याचबरोबर ना. मुनगंटीवार यांनी मा. मुख्‍यमंत्र्यांशी दुरध्‍वनीवरून सुध्‍दा चर्चा केली आहे व मा. मुख्‍यमंत्र्यांनी ही मागणी ताबडतोब मान्‍य केली असल्‍याचे ना. मुनगंटीवार म्‍हणाले.
अशा प्रकारच्‍या घटना भविष्‍यात घडू नये याची काळजी महावितरण कंपनीच्‍या अधिका-यांनी घ्‍यावी असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले. अपघातानंतर भाजपा नेत्‍या व जिल्‍हयाच्‍या महिला आघाडीच्‍या अध्‍यक्षा अल्‍का आत्राम, अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, बंडू बुरांडे, वैभव पिंपळशेंडे, श्री. सातपुते यांनी घटनास्‍थळावरून पुढील सर्व मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत