Top News

भानामती करणी थोतांड आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा:- विलासराव मोगरकार pombhurna


देवाडा खुर्द येथे पार पडला अंधश्रद्धा प्रबोधन कार्यक्रम
पोंभूर्णा:- ग्रामपंचायत देवाडा खुर्द, पोलिस स्टेशन पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच भानामती, करणी, चमत्कार या मानसिक बिमारीतून नागरिक‌ बाहेर निघावे यासाठी देवाडा खुर्द‌‌‌ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून जादुटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव मोगरकार, प्रमुख पाहुणे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार,जामतुकूमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, प्रमुख मार्गदर्शक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे,अनिल लोणबले, महेंद्र शेडमाके,सुरज गोरंतवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामिण भागात अघोरी प्रथा व जादुटोण्यावर मोठा विश्वास आहे.गावकरी वैद्यकीय उपचार पद्धती पेक्षा करणी,टोटके यावर विश्वास ठेवून असतात.अनेकांनी अघोरी प्रथेमुळे जीवही गमवला आहे. हि अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पोंभूर्णा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवाडा खुर्द‌‌‌ यांच्या संयुक्त विद्यमाने देवाडा खुर्द‌‌‌ येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनेक उदाहरणे देत अघोरी प्रथा व बळी प्रथा यावर मार्गदर्शन केले.नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट तसेच अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंध आणि उच्छाटण कायदा, जादुटोणा विरोधी कायदा, व्यसनमुक्ती, चमत्कार आणि त्यातील सत्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मंत्र तंत्राने कोणालाही मारता येणार नाही,कोणीही जादूटोणा करू शकत नाही जर कोणी मांत्रीक अंनिसच्या कार्यकर्त्यांना मारेल त्याला पंचेवीस लक्ष रूपयांची बक्षीस जाहीर करू असे आवाहन करण्यात आले. यावेळी अंगात येणे, भुताने झपाटने,भूत काढणे,निंबूतून करणी काढणे,नारडातून कापड काढणे,जिंभेत त्रिशूल भोसकणे, अग्नीकुंड लावणे, अंगात आल्यानंतर जळता कापूर खाणे,यासह अन्य विषयांवर चमत्कार सादर करून त्यामागील विज्ञान समजावून सांगण्यात आले. प्रास्ताविक ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन ठाकुरदास गव्हारे यांनी तर आभारप्रदर्शन दिलीप शिंदे यांनी केले. यावेळी गावकऱ्यांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने