Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भिमणी येथे गोंड गोवारी समाजाची ४५० वर्षांची ढाल पुजण

 सांस्कृतिक परंपरा जोपासत उत्साहात साजरा 


पोंभूर्णा :- येथून जवळच असलेल्या भिमणी येथे ४५० वर्षांची परंपरा असलेली  ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेली गायगोधण व ढाल पुजण येथील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आले.

गायी राखणे हा गोंड गोवारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय असल्याने लोकं गायीची भक्तीभावाने पुजा करून कृतज्ञता व्यक्त करतात.४५० वर्षांपासून सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा भक्तीभावाने जोपासल्या जात आहे.

 ढाल पुजणाचे कार्यक्रमाच्या वेळी एका बासावर चंदनाच्या लाकडाची कोरलेली चार मुखी ढाल लावून, मोरपंख व नविन फडकी लावून त्याची विधीवत पुजा केली जाते. गोंड गोवारी जमातीचे लोकं दैवत असलेल्या वाघोबा, नागोबा मुर्तीची पुजा करून हि ढाल मिरवणूक या  गावातीलच जमातीचे माहेरघर असलेल्या गावातील आत्राम घराण्यातल्याच्या आत्राम यांचे घरी विधीवत पुजा अर्चा व ढालीला पाणी अर्पन करून साजरा करतात.पुन्हा गावातून समाजाचे पारंपारिक  टिपऱ्या नृत्य करीत मिरवणूक काढण्यात येते. रॅली, मिरवणूक, संस्कृती, कला, इतिहास, कौशल्य,परंपरा,लाठी कला, पारंपरिक नृत्य यात यांचा समावेश होता.


या कार्यक्रमाला आदिवासी गोंडगोवारी संस्कृती व कल्याण मंडळाचे जिल्हा अध्यक्ष गजानन कोहळे, उद्घाटक सचिव प्रा.पत्रूजी नागोसे, प्रमुख पाहुणे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम,माजी उपसभापती विनोद देशमुख, रणजीत पिंपळशेंडे, प्रशांत नागोसे,बंडू सोनावणे, नामदेव ठाकूर, प्रविण कोलांडे,अनंता लोहट, विनोद आत्राम,सोनू इष्टाम, संतोष गेडाम, गणेश राऊत यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत