Top News

PET परीक्षा उत्तीर्ण होणारा राजेश बसवेश्वर हजारे ठरला एटापल्ली तालुक्यातील पहिला विद्यार्थी #chandrapur


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत प्रत्येक वर्षी पी.एच.डी पूर्व परीक्षा घेण्यात येते. या वर्षी सुद्दा या परीक्षेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येते घेण्यात आले होते. राजेश बसवेश्वर हजारे यांनी परिक्षा दिली. व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मार्फत या परीक्षेचा निकाल दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात राजेश बसवेश्वर हजारे यांनी उत्तीर्ण होऊन एटापल्ली तालुक्यातून प्रथम पास होण्याचा मान मिळवला.
 राजेश बसवेश्वर हजारे यांचे मागील 6 वर्षा पासून चंद्रपूर येथे शिक्षणं सुरू आहे. त्यांनी अर्थशास्त्र विषयात बी.ए आणि राज्यशास्त्र विषयात एम.ए पदवी प्राप्त केली आहे. व त्यांनी प्रथमदाच ही परीक्षा दिली होती. आणि त्यांना हा यश प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण तालुक्याचा मान वाढविला आहे. त्यांनी हा यशाचा श्रेय त्यांचे वडील बसवेश्वर बापूराव हजारे व आई सत्यमा बसवेश्वर हजारे यांना दिले आहे. तसेच सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद काटकर, विजय सोंमकुवर, कुलदीप गोंड, इत्यादी शिक्षकवृंदाना दिले. या यशा मुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने