Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; वनमजूरावरही बिबट्याने केला हल्ला #chandrapur

बोर्डा झुल्लूरवार शेतशिवारातील घटना
पोंभुर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लूरवार शेत शिवारातील सर्वे नंबर १७८ मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २७ आक्टोंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच तात्काळ वन अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन फटाके फोडून बिबट्याला पडवून लावण्याचा प्रयत्न करीत होते मात्र चवताळलेल्या बिबट्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या वनमजूरावर हल्ला चढवून गंभीर जखमी केली असल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
काशिनाथ गावडे वय ५४ वर्ष रा.बोर्डा झुल्लूरवार व वनमजूर मनोज गद्देकार वय ४० वर्ष रा.देवाडा खुर्द असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी व त्यांची टीम करीत आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी शेतकरी काशिनाथ गावडे व वनमजूर मनोज गद्देकार यांची पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार यांनी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन जखमींना तात्काळ पाच-पाच हजार रूपयांची आर्थिक मदत केली. घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी सभापती अल्का आत्राम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत