Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोंभूर्णा येथे भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन

30 ऑक्टोंबर ला भव्य रक्तदान शिबिर

आशिष कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
 


पोंभूर्णा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामध्ये कोणताही भेदभाव नाही.सर्व धर्म जातीसाठी एकच रक्त उपयोगात येते.आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा अत्यंत तुटवडा असून रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुका प्रमुख तथा पोंभूर्णा नगरपंचयात विरोधीपक्ष गटनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑक्टोंबर ला युवासेने तर्फे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे महिला आघाडी शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप व वृक्षरोपण कार्यक्रम व युवासेना पोंभूर्णा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन्सिल वाटप व विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत