Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

16 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 माओवाद्यांचा खात्मा #chandrapur #gadchiroli


जवानांनी मोठी कारवाई
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या कारवाईमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
या दोन्ही जहाल माओवाद्यांवर 16 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सिकसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. कडमेच्या जंगलात पोलिसांचे माओवाद्याविरोधी अभियान सुरू असतांना माओवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन माओवाद्याचा मृत्यू झाला.
या दोन्ही माओवाद्यांवर दोघांवर 16 लाखाचे बक्षीस आहे. मृतकामध्ये माओवाद्याच्या एक्शन टीमचा कमांडर जागेश सलाम आणि विभागीय समिती सदस्य दर्शन पद्दाचा समावेश आहे. घटनास्थळी एक बंदुकीसह दोन पिस्तूल वाकीटाकी जीवंत काडतुसे रोख रक्कमेसह स्फोटके सापडली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत