Top News

अवैध दारुविक्री करणाऱ्या 18 आरोपींविरुध्द 24 गुन्ह्यांची नोंद #chandrapur



चंद्रपूर:- राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे 23 व 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपुर जिल्ह्यांतील अवैध दारु विक्री व हातभट्टी दारु निर्मिती, विक्री विरोधात मोहीम राबविण्यात आली. यात 18 आरोपीविरुध्द 24 गुन्हे नोंदविण्यात आले तसेच 1 लाख 15 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंद्रपुर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान तसेच नागपुर जिल्ह्यातील भरारी पथकाने भद्रावती, चिमुर, चंद्रपुर, सावली, नागभीड, गडचांदूर, सिदेवाही, वरोरा, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, राजुरा या तालुक्यांत धाडी टाकुन दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत वरील कारवाई करण्यात आली. याप्रसंगी ब्रम्हपुरी भागात दोन परमीट रुमवर नियमभंग प्रकरणे देखील नोंदविण्यात आली.

सदर कामगिरी नागपुर उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वंदे यांचे आदेशान्वये तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. एस. पाटील, विकास थोरात, ईश्वर वाघ, दुय्यम निरीक्षक अनंतकुमार खांदवे, संदीप राऊत, संजय आक्केवार, अमित क्षीरसागर, अभिजीत लिचडे, जगदीश पवार, मोनाली कुरुडकर तसेच चंद्रपुर जिल्हा कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने