शहरातील तरुणाई नशेच्या विळख्यात #chandrapur


गांजासह अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- शहरासह रोज गांजाची विक्री होते. इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे.

शहरात चार ते पाच विक्रेते रोज गांजाची विक्री करतात. पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांनी थेट सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम विक्री सुरू केली. गांजाची नशा करणाऱ्या तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही. गडचांदूर शहरातील काही लोक खुलेआम गांजा विक्री करताना आढळून येतात व त्यांचे जास्तीत जास्त गिऱ्हाईक हे शहरातील तरुण व युवा आहेत. गोगो नामक पेपर मध्ये गांजा गुंडाळून सिगरेट प्रमाणे नशा करणे, चिल्लम द्वारे गांजाचा नशा करणे हे सर्रास केले जाते. गडचांदूर परिसरात सुद्धा गांजा पिणाऱ्यांची तुंबळ असते. गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असेल तर, पोलिसांसाठी हे केवळ चार दिवसांचे काम आहे.

थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन शहरात गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचता येते. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होणार आहे .कायद्याची दहशत निर्माण करून पोलिसांनी तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा गडचांदूरचा 'उडता पंजाब' होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.

1 टिप्पणी: