ग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती कर:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati


जिवती:- जय विदर्भ पार्टीचे नेते, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदामभ राठोड यांनी डी. एच. ओ. साहेब जि. प.चंद्रपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले.
जिवती तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, सर्व सामान्य माणसाचे फार हाल होत आहे, म्हणून अतिदुर्गम भागामध्ये रुग्णांना सोयीची आरोग्य सुविधा मिळाली पाहीजे,परंतु अस होतांनी दिसत नाही, जिवती तालुक्यामध्ये शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.आम्ही जिवती तालुक्यामध्ये जन्माला आलो म्हणून काय पाप केला का? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडतो आहे, कारण कोणत्याच राज्यकर्त्याला आमच्या जिवती तालुक्यातील सामान्य माणसाच्या आरोग्याविषयी काळजी नाही .फक्त निवडणूक आली म्हणजे प्रस्थापित राज्यकर्त्यांना सामान्य जनता आठवते हे अत्यंत निंदनीय आहे ही पध्दत आता बंद झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण सामान्य जनतेचे दुःख लक्षात घेऊन सात दिवसाच्या आत जिवती तालुक्याला तात्काळ आरोग्य अधिकारीची नियुक्ती करून आम्हा सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्याल अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समिती आमरण उपोषण करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत