Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व एकीचा विनयभंग #chandrapur #Saoli

पास्कोअंतर्गत दोन गुन्हे दाखल:तीन आरोपिंना अटक
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मागील चार दिवसात विनयभंग आणि बलात्काराच्या तीन घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पत्रू गोहणे या नराधमाने एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अंतर्वस्त्रात हात घालून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केल्याने त्याच्यावर भादंवि ३५४ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली.
व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर (१९) या आरोपीने दुसऱ्या गावातील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले. मात्र लग्नास नकार
दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ अन्वये तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या २५ वर्षीय युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात ती गर्भवती झाली. लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत