Click Here...👇👇👇

इको-प्रो ची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत दूषित पाणी व दुर्गंधी विषयी दिली माहिती #chandrapur

Bhairav Diwase
रामाळा तलावातील सांडपाणी त्वरित सोडून पुढील टप्प्यातील कामाची सुरुवात करण्याची जिल्हाधिकारी कड़े इको-प्रो ची मागणी

पालकमंत्री यांनी दिले जिल्हाधिकारी यांना त्वरित आढावा घेण्याचे निर्देश
चंद्रपूर:- नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दौरा दरम्यान भेट घेत रामाला तलाव मधील जमा झालेले दूषित सांडपाणी, दुर्गंधि विषयी माहिती देत रामाला तलावच्या खोलिकरण व सौंदर्यीकरण च्या पुढील टप्प्याचे कामास सुरुवात करण्यास रामाला तलाव मधील पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. याबाबत त्वरित आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इको-प्रो तर्फे रामाला तलाव संवर्धन करिता करण्यात आलेले पाठपुरावा व कार्य विषयी सविस्तर निवेदन देत पुढील कामकरिता तलाव मधील पाणी सोडने आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली.

चंद्रपूर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाचे प्रदुषणाची समस्या लक्षात घेता मागिल अनेक वर्षापासुन इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने स्वच्छता श्रमदान तसेच तलाव संवर्धनाच्या मागणी सत्याग्रह सुध्दा करण्यात आले. शहरातिल एकमेव ऐतिहासिक असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या सत्याग्रहाची दखल घेत मागिल वर्षीपासुन तलाव खोलिकरण व संवर्धनाचे कार्य जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधी अंतर्गत सुरू करण्यात आले. यात मागील वर्षी खोलीकरणाचे कार्य पुर्ण झाले. काही बांधकाम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. आता पुढील कामाकरिता तलावातिल पाणी सोडुन कार्यास गती देण्याची आवश्यकता आहे. यांसदर्भात यापुर्वी झालेल्या बैठकी व कार्याचा आढावा घेण्यात यावा, व या ऐतिहासिक रामाळा तलावास प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
यंदा प्रस्तावीत असलेली कामे, त्या संदर्भात प्रशाशकीय पातळीवरील सध्यस्थिती पाहुन संबधीत विभागाना आवश्यक निर्देश देण्यास विनंती आहे. तलावातील फुट ओवर ब्रिजचे बांधकाम, जलनगर बाजुचे एसटीपी बांधकाम, जलनगर बाजुने रिंटेनिग वॉल चे बांधकाम, रामाळा तलावात येणारा मच्छीनाला वळवीने, तलावाच्या आतिल किल्ला परकोट भिंतीची दुरस्ती, रामाळा तलाव ते बगड खिडकी पाथवे चे बांधकाम व रामाळा उदयानाचे सौदर्यीकरण आदी महत्वाची कामे करणे व त्यास गती देणे आवश्यक असल्याने यासदर्भात आपले स्तरावरून उचित निर्देश देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
रामाळा तलावातील पाणी सोडण्याची प्रकीया ऑक्टो महिन्याच्या शेवटीपासुन सुरू करण्याची गरज होती, त्यास विलंब झालेला आहे. ते लवकर झाल्यास तलाव कोरडा होउन आवश्यक आणि मंजुर बांधकामे पुर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळु शकेल, याबाबत चर्चा झालेली होती मात्र जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने या कामास विलंब झालेला असुन, तलावात जमा सांडपाणी यामुळे मासे मृत झाले असुन, पाण्यास घाण वास सुटलेला आहे, परिसरात दुर्गधीचे वातावरण पसरले असुन नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रामाळा तलावातील जमा झालेले सांडपाणी त्वरीत सोडुन उर्वरित कामास गती देण्याची विनंती असुन त्याकरिता कृपया यांसदर्भात आपण सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.
तलावातील दुषीत पाण्याचे प्रदुषणामुळे, मासे मृत होत असुन परिसरात दुर्गधीची समस्या तलाव खोलिकरणावेळेस वळता केलेला मच्छीनाला पावसाळयात पुर्ववत झाल्याने मच्छी नालाचे पाणी पुर्णपणे तलावात जमा झालेले आहे, तसेच जलनगर कडुन येणारे सांडपाणी यामुळे तलावात जमा झालेले दुषीत सांडपाणी यामुळे मासे मृत होणे, सोबतच पाण्यास सुटलेली वास यामुळे परिसरात दुर्गधीचे वातावरण झालेले आहे.
शहराच्या मधोमध असलेले तलाव परिसर स्थानिक नागरीकांना फिरण्यास महत्वाचे ठिकाण असल्याने नागरीकांची गर्दी सुध्दा असते. पंरतु तलाव परिसरातील दुर्गधीमुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, परिसरातील नागरीक, रूग्णालय व महाविदयालय यांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तलावाचे पाणी त्वरीत सोडणे अत्यावश्यक असुन यामहे सध्यपरिस्थतीतील दुर्गधीची समस्या व पुढील तलाव संवर्धनाची आवश्यक कामे करणे सोईचे होईल.