Top News

जुनोना तलाव परिसरात इको- प्रो संस्थेच्या वतीने पक्षी निरीक्षण व स्वच्छता अभियान #chandrapur #junona


चंद्रपूर:- इको प्रो पर्यावरण प्रेमी संस्थेच्या माध्यमातून मागील आठवड्यापासून समाजकार्य विद्यार्थ्यांसाठी निसर्गासाठी युवा शिबिर सुरू आहे. यादरम्यान गोंडकालीन वैभव लाभलेल्या जुनोना तलाव परिसरामध्ये पक्षी निरीक्षण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
निसर्गाच्या संवर्धनासाठी युवकांचे योगदान वृद्धिंगत व्हावे यासाठी इको प्रो संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली यांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 1 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळेमध्ये सुरू आहे.
पक्षी सप्ताह निमित्त जूनोन येथील ऐतिहासिक गोंडकालीन तलाव परिसरामध्ये पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला होता. यादरम्यान पक्षी संवर्धन विभागाचे प्रमुख बंडू दुधे यांनी विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती पक्षी अधिवासांची माहिती दिली. यादरम्यान पक्षांचा पर्यावरणातील महत्त्व आणि स्थलांतरित पक्षी त्यांचा अधिवास याबाबतही विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तलाव मधील जलपर्णी मुळे पक्षी अधिवास धोक्यात आलेला आहे. अद्याप स्थलांतरित पक्षी आलेले नसले तरी स्थानिक पक्षी यामुळे परिसर मधे कमी प्रमाणात आढळून आले.

जुनोना तलावात मोठ्या प्रमाणात जलपरीय वनस्पती वाढल्यामुळे तलावाचे सौंदर्य बाधित झालेला आहे. सोबतच पक्षांचा एक मुख्य अधिवास आता संकटात आहे, अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. या तलावातील जलपर्णीय वनस्पती काढून तलावाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. या संदर्भात इको प्रो संबंधित विभागासोबत शासनासोबत पाठपुरावा करेल आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. यावेळी सहभागी विदयार्थ्यांना जूनोना तालाव परिसर, जलमहल गोंड़कालीन इतिहास, वन-वन्यजीव, तलाव अधिवास संवर्धन याबाबत बंडू धोतरे यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
तलाव परिसरामध्ये वनभोजन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणारी अस्वच्छता तलावाच्या नैसर्गिक अधिवासात बदल पोहोचत आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या परिसरात स्वच्छता अभियान राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकाऊ प्लेट आणि दारूच्या बॉटल देखील एकत्रित करून त्या जमा करण्यात आल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने