Top News

ब्रम्हपुरीत नरभक्षक 'सॅम २' पट्टेदार वाघ जेरबंद #chandrapur #bramhapuri #Tiger

चार शेतकऱ्यांचा घेतला होता बळी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्यांवर हल्ले करून चार शेतकऱ्यांचा बळी घेणारा नरभक्षक सॅम २ नावाचा पट्टेदार वाघ जेरबंद करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी (दि.८) सायंकाळी या वाघाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागला यश आले आहे. अडीच ते तीन वर्षाचा हा नर जातीचा वाघ असून त्याला चंद्रपूर येथील ट्रॉझिंट ट्रिटमेंट सेंटरमध्ये तातडीने हलविण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात ठिकठिकाणी वाघाचे दर्शन ही नित्याची बाब झाली आहे. ऐन शेतीचा हंगाम असताना शेतकऱ्यांना वाघांच्या दहशतीत शेतावर जावे लागत आहे. शेतात धानपीक असल्याने पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतावर गेलेल्या चार शेतकऱ्यांना या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले होते. या चारही मनुष्यहानीच्या घटनात सॅम २ चा सहभाग असल्याचेही ट्रॅप कॅमेरामध्ये निष्पन्न झाले.
या घटनानंतरही सॅम २ वाघाचा वावर शेतशिवारात सुरूच असल्याने अन्य शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने सॅम २ वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता वनविभागाने पाऊले उचलले होते. काल ८ नोव्हेंबरला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राती उपक्षेत्र सायगाटा कक्ष क्रमांक ११८ मध्ये सायंकाळी सातच्या सुमारास पशु वैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शुटर अजय मराठे यांनी 'डार्ट'मारून सॅमला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक चोपडे, वनक्षेत्रपाल गायकवाड, शेंडे यांचे नेतृत्वात बेशुध्द करून जेरबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने