आयटीआयच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या


कामाचा वाढता दबाव असल्याने स्वतःलाच संपविले

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली येथील लिपिक प्रवीण जी. केमेकार (वय 32 वर्ष ) यांनी तण नाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे.कामाच्या वाढत्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात असल्यामुळे परिसरात चांगलीच खलबळ माजली आहे.
काल दि.14/11/2022 ला सकाळी सहा वाजता आपल्या कॉलनीतील काही लोकांसोबत फिरून आल्यानंतर आपल्या पत्नीला आयटीआय मध्ये जातो असे सांगून सकाळी 7 वाजता निघून गेल्यानंतर प्रवीण हा सावली तालुक्यातील बोथली ते पांढरसरड रोडवर हनुमान मंदिराजवळ त्याने तन नाशक विषारी औषध घेतल्यानंतर आपल्याच आयटीआय मधील विद्यार्थी याला मोबाईलवर कॉल करून पूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवीणला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 9-30 ला जिल्हा रुग्णालय दाखल केल्यानंतर बारा ते सव्वा बाराच्या सुमारास प्रवीण चा मृत्यू झाला. असे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रवीणला आयटीआय मधील कामाचा जास्त व्याप असल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली असेच सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रवीण यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्या मागे पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आहे. आयटीआय मध्ये दोन लिपकाची कामे प्रवीण करायचा सुट्टीच्या दिवशी पण ऑफिसमध्ये जायचं याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असे प्रयत्न निर्माण झालेले आहे. प्रवीणला योग्य ते न्याय देण्यात यावे ही सावलीकरांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत