Top News

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र वढा यात्रेत भाविकांची उसळली गर्दी

चंद्रपूर:- वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगामावर वढा येथे दरवर्षी आषाढी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा मागील २ वर्षांपासून रद्द करण्यात आली आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तिर्थक्षेत्र वढा येथे यात्रा भरली असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
वढा येथे विठ्ठल रुख्मिणीचे पुरातन मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगामावर हे मंदिर असल्याने यात्रेसाठी विदर्भातील ठिकठिकाणाहुन श्रद्धाळु मोठया संख्येने येथे येतात. त्रिवेणी संगमावर गंगास्नान करून भाविक विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतात. या तीर्थक्षेत्राला विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळखले जाते.
पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने