बेकायदेशीर धंद्यावर चंद्रपूर गुन्हे शाखेची नजर?


क्रिकेट जुगारातूनच गवसणार कडी.


मूल:- क्रिकेट मैचवर जुगार खेळणाऱ्यांवर चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखेने कारवाई उशिरा का होईना केली. मूल शहर क्रिकेट मैच जुगाराचा अडडा असल्याची ओरड गत अनेक वर्षापासून सुरु आहे. या जुगाऱ्यांची स्थानीक सेटींग जोरदार असल्याने शेवटी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला यांचा गेम करावा लागला. पुढील तपास सुरू आहे आता चंद्रपूर गुन्हे शाखेच्या माध्यमातून मूल तालुक्यातील अवैध धंद्यावर पोलीस मुख्यालयाची नजर राहील अशी कुजबूज सुरु आहे.
  या कारवाईतून पोलीस प्रशासनाने मनात आणले तर शहरातून चालणारे कित्येक बेकायदेशीर धंदे या मैच जुगाराचे निमित्याने उघड होऊ शकतात अशी चर्चा आहे. नवीन पोलीस अधिक्षक रुजू झाल्यानंतर मूल शहरातून गत अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अनेक बेकायदेशीर धंद्यांपैकी एक उघड झाला आहे.
      धाडीनंतर नाना तोडेवार, अझरूद्धीन काझी  या 2 आरोपींना अटक तर विजय केशवानी नामक तिसरा आरोपी फरार आहे. 2 आरोपी ताब्यात आहेतच जर तिसरा गवसला तर शहरातून चालणाऱ्या अवैध धंद्याची मोठी कडी पोलिसांचे हातात आयती चालून येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
 
  बेकायदेशीर सुगंधीत तंबाखू विक्री, संपुर्ण तालुक्यातून चालणारा जुगार व क्रिकेट मैचवर चालणारा सटटा यावर फार मोठी बेकायदेशीर उलाढाल सुरू असल्याची ओरड सुरू आहे.
  गत अनेक दिवसांपासून या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याची ओरड सुरू होती. चंद्रपूर गुन्हा शाखेने नवीन पोलीस अधिक्षकांचे नेतृत्वात काही अंशी का होईना दिलासा दिला आहे. मात्र क्रिकेट मैच जुगारात गवसलेल्या आरोपींना खाक्या दाखवला तर इतरही बडे बेकायदेशीर धंद्याचे घबाड पोलीसांना गवसणार अशी सगळीकडे चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत